Ezekiel 7:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“त्या लोकांनी आपल्या सुंदर दागिन्यांचा उपयोग करुन मूर्ती घडविली. त्यांना त्याचा अभिमान वाटत होता. त्यांनी भयानक मूर्ती बनविल्या. त्यांनी अशा घाणेरड्या वस्तू तयार केल्या. म्हणून मी (देव) त्यांना घाणेरड्या लक्तराप्रमाणे दूर फेकून देईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्यांची केलेली भूषणे दिमाख दाखवण्यासाठी वापरली; त्यांनी त्याच्या अमंगळ मूर्ती व तिरस्करणीय वस्तू आपणांसाठी बनवल्या; म्हणून ते त्यांना अमंगळ वस्तूसमान वाटावे असे मी केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी त्यांच्या सुंदर दागिन्यांविषयी गर्व केला आणि त्यांच्या अमंगळ मूर्ती बनवण्यास त्यांचा उपयोग केला. त्यांनी त्यांच्या व्यर्थ प्रतिमा बनविल्या; म्हणून ते दागिने मी त्यांच्यासाठी अशुद्ध करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते त्यांच्या दागिण्यांवर घमंड करीत होते, त्यांच्या मूर्ती त्यांनी तिरस्कार आणणाऱ्या घृणा निर्माण करणाऱ्या तयार केल्या होत्या. तिरस्करणीय कार्य त्यांच्याशी केले आहे. म्हणून या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी अपवित्र केल्या आहे.