Ezekiel 7:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी दुसऱ्या राष्ट्रांतून दुष्ट लोक आणीन. ते इस्राएलच्या लोकांची सर्व घरे बळकावतील. तुमचे गर्वाचे घर मी खाली करीन. तुमची पूजास्थाने दुसऱ्या राष्ट्रांतील लोक ताब्यात घेतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव मी परराष्ट्रांतले अधमाधम जन आणीन; ते त्यांची घरे हस्तगत करतील, मी जबरदस्तांचा ताठा मोडीन; त्यांची पवित्र स्थाने भ्रष्ट होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वात दुष्ट राष्ट्रांना मी आणेन जे त्यांच्या घरांचा ताबा घेतील. बलवानाच्या गर्वाचा मी शेवट करेन, आणि त्यांची पवित्रस्थाने भ्रष्ट होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देशावर सर्वात दुष्ट लोक घेऊन येईन आणि ते त्यांची घरे बळकावून घेतील, आणि मी त्यांचा गर्व समाप्त करेन कारण त्यांनी पवित्र ठिकाण अमंगळ केली आहेत.