Ezekiel 7:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एकामागून एक वाईट गोष्टी तुम्ही ऐकाल. तुमच्या कानावर फक्त वाईट बातम्याच पडतील. तुम्ही संदेष्ट्याला शोधून दृष्टान्ताबद्दल विचारायला पाहाल, पण तुम्हाला असा कोणीच भेटणार नाही. याजकाजवळ तुम्हाला शिकविण्यासारखे काहीच नसेल. वडीलधारी मंडळी (नेते) तुम्हाला योग्य सल्ला देणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नाशावर नाश येईल, अवईवर अवई उठेल; ते संदेष्ट्यांना दृष्टान्त पाहायला सांगतील, पण याजकांचे नियमशास्त्रज्ञान व वडिलांचे मसलत देण्याचे सामर्थ्य ही नष्ट होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
विपत्तीनंतर विपत्ती, आणि अफवांवर अफवा येतील. संदेष्ट्याकडून दृष्टान्ताचा शोध करतील, नियमशास्त्रातील याजकीय सूचना थांबतील, वडील लोकांच्या बोधप्रद मसलतीचा शेवट होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अनर्थावर अनर्थ येईल अफवांवर अफवा पसरतील, मग ते संदेष्ट्याला संदेश पहाण्यासाठी सांगतील, दृष्टांत विद्या, सल्ला, वडीलांची बुध्दी संपून जाईल.