Ezekiel 7:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता लवकरच, तुम्हाला, मी किती रागावलो आहे, ते कळेल. मी माझा सगळा राग तुमच्यावर काढीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही केलेल्या भयंकर कर्मांची किंमत मी तुम्हाला मोजायला लावीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता मी आपल्या संतप्त क्रोधाचा तुझ्यावर सत्वर वर्षाव करीन, मी आपल्या क्रोधाची परिपूर्ती तुझ्यावर करीन व तुझ्या आचरणाप्रमाणे तुझा न्याय करीन व तुझ्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुला देईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी आपला क्रोध तुमच्यावर लवकरच ओतीत आहे आणि माझा राग तुमच्याविरुद्ध भडकणार आहे. तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता जास्त काळ मी तुम्हाविरुध्द आपल्या त्वेषाने माझ्या रागाची ओतणी तुम्हावर करेन, जेव्हा मी तुमच्या कृत्याप्रमाणे न्यायाचा निकाल करेन तेव्हा तुमचाच सर्व प्रकारचा घृणितपणा तुमच्यावर येईल.