Ezekiel 8:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एके दिवशी मी (यहेज्केल) माझ्या घरात बसलो होतो व यहुदातील वडीलधारी लोक (नेते) माझ्यासमोर बसले होते. परागंदा काळातील सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या (सप्टेंबरच्या) पाचव्या दिवसाची ही गोष्ट आहे. एकदम माझ्यावर परमेश्वराचे, सामर्थ्य आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पंचमीस असे झाले की मी आपल्या घरी बसलो होतो व यहूदाचे वडील माझ्यासमोर बसले होते. तेव्हा तेथे प्रभू परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, जेव्हा मी माझ्या घरात बसलो होतो आणि यहूदीयाचे वडीलजन माझ्यापुढे बसले होते, तिथे सार्वभौम याहवेहचा हात माझ्यावर आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग बाबेलातील बंदिवासाच्या सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी मी माझ्या घरात बसलो असता यहूदाचे वडील माझ्या पुढे बसले होते, तेव्हा पुन्हा परमेश्वर देवाचा वरदहस्त माझ्यावर आला.