Ezekiel 8:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मी आत जाऊन पाहिले ज्यांचा विचारही अमंगळ वाटावा अशा सर्व प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या व पशूंच्या मूर्ती तेथे होत्या. त्याच घाणेरड्या मूर्तींची इस्राएलचे लोक पूजा करीत होते. प्रत्येक भिंतीवर त्या प्राण्यांची चित्रे कोरलेली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आत जाऊन पाहिले तर सरपटणारे प्राणी, अमंगळ पशू व इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ती ह्यांची चित्रे भिंतींवर चोहोकडे काढलेली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून मी आत गेलो आणि पाहिले की भिंतीवर सर्वत्र सर्वप्रकारचे सरपटणारे प्राणी आणि अशुद्ध जनावरे व इस्राएलच्या मूर्तींची चित्रे बनविलेली मला दिसली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी बघण्यासाठी गेलो, आणि पाहा! तेथे सर्व प्रकारचे सरपटणारे आणि अशुद्ध प्राणी होते, इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ती यांची चित्रे यरूशलेमेच्या भितींवर टांगलेल्या होत्या.