Ezekiel 8:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलधारे अंधारात काय करीत आहेत. हे तुला दिसतेच ना? प्रत्येक माणसाला त्याच्या खोट्या देवासाठी वेगळी खोली आहे. ते लोक मनाशी म्हणतात ‘परमेश्वर आम्हाला पाहू शकत नाही. परमेश्वराने ह्या देशाचा त्याग केला.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएल घराण्याचा प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते ना? ते तर म्हणतात की, ‘परमेश्वर आम्हांला पाहत नाही; परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलजन आपआपल्या मूर्तिघराच्या अंधारात काय करीत आहेत ते तू पाहिलेस काय? ते म्हणतात, ‘याहवेह आम्हाला पाहत नाही; याहवेहने आम्हाला टाकले आहे.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू पाहिलेस का इस्राएलाच्या घराण्याचे वडील अंधारात काय करतात ते? प्रत्येक मानव मूर्तीच्या गृहात लपून काय करतात, ते म्हणतात, परमेश्वर देव आम्हास बघत नाही, म्हणून परमेश्वर देवाने त्यांचा त्याग केला आहे.