Ezekiel 8:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग देव म्हणाला, “मानवपुत्रा, हे पाहतो आहेस ना? यहुदाच्या लोकांना माझे मंदिर अशी भयंकर कृत्ये करण्याएवढे क्षुद्र वाटते. हा देश हिंसेने भरला आहे. ते मला संतापविणारी कृत्ये सतत करीत आहेत. पाहा! खोट्या देवाप्रमाणेच चंद्राला मान देण्यासाठी नाकांत नथनी घालीत आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला हे दिसते ना? यहूदाचे घराणे येथे ही अमंगळ कृत्ये करत आहे, हे थोडे झाले काय? देश जुलमाच्या कृत्यांनी भरून ते मला पुनःपुन्हा संतापवतात; पाहा, ते आपल्या नाकास डाहळी लावत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिलेस काय? या ज्या अमंगळ गोष्टी ते करतात ते यहूदाहसाठी क्षुल्लक आहेत काय? त्यांनी आतंकाने देश भरून सातत्याने माझा राग भडकवावा काय? त्यांच्याकडे पाहा, ते कशी आपल्या नाकाला फांदी लावत आहेत!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू हे पाहिलेस का? यहूदाचे घराणे याही ठिकाणी घृणास्पद गोष्टी करीत आहे. ते कमी आहे का? म्हणून त्यांची भूमी अहिंसेने भरुन गेली आहे, त्यांनी पुन्हा माझ्या रागाला चिथवीले आहे, त्यांनी आपल्या नाकांनी फांद्या धरुन ठेवल्या आहे.