Ezekiel 8:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे लोक किती भयानक गोष्टी करीत आहेत, हे तू पाहतोस ना? त्यांनी ही गोष्ट अगदी माझ्या मंदिरालगत उभी केली. आणि जर तू माझ्याबरोबर आलास, तर तुला आणखी भयानक गोष्टी दिसतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ते काय करीत आहेत ते पाहतोस ना? मी आपल्या पवित्रस्थानातून दूर निघून जावे म्हणून अशी अमंगळ कृत्ये इस्राएल घराणे येथे करीत आहे; ह्याहूनही अधिक अमंगळ कृत्ये तुझ्या दृष्टीस पडतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, ते जे काही करीत आहेत ते तू पाहतोस काय; इस्राएली लोक या ठिकाणी अमंगळ गोष्टी करीत आहेत, ज्यामुळे माझ्या पवित्रस्थानातून मी दूर केला जाईन? परंतु यापेक्षाही अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ते काय करत आहेत हे तू पाहिले काय? तेथे मोठे घृणा आणणारे कृत्ये करीत आहे, मी आपल्या पवित्र ठिकाणाहून निघून जाण्यासाठी इस्राएल घराणे करीत आहे, तुम्ही जाऊन पाहा ते मोठे घृणास्पद आहे.”