Ezekiel 9:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर मी वरच्या प्रवेशद्वाराकडून सहा माणसांना येताना पाहिले. हे प्रवेशद्वार उत्तरेला होते. प्रत्येकाच्या हातात प्राणघातक शस्त्रे होती. एकाने तागाचे कपडे घातले होते. त्याच्या कमरेला लेखणी आणि दौत होती. ते लोक मंदिरातील काशाच्या वेदीपाशी जाऊन उभे राहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पाहा, उत्तरेकडील वरच्या वेशीने सहा पुरुष आपल्या हाती विध्वंसक हत्यारे घेऊन आले; त्यांच्यामध्ये शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेला एक मनुष्य होता; त्याच्या कंबरेनजीक कारकुनाची दऊत होती. ते आत जाऊन पितळी वेदीजवळ उभे राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि वरील दरवाजा, ज्याचे मुख उत्तरेकडे होते त्या दिशेकडून सहा पुरुष येत असलेले मी पाहिले, प्रत्येकाच्या हाती घातक शस्त्रे होती. त्यांच्याबरोबर एक पुरुष होता ज्याने तागाची वस्त्रे घातली होती व त्याच्याकडे लेखन सामुग्री होती. ते येऊन कास्य वेदीजवळ उभे राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग पहा! उत्तर दिशेने प्रवेश व्दारातून सहा जण आपल्या हाती जनावर ठार करणारे हत्यार आणि अंगात तागाचे वस्त्र परिधान केलेले, एका बाजूस शास्रांचे उपकरण होते, मग ते जाऊन पितळेच्या वेदीजवळ उभे राहीले.