Ezekiel 9:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती माणसे लोकांना मारायला गेली असताना, मी तेथेच थांबलो. मी वाकून नमस्कार केला आणि आक्रोश करुन म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, यरुशलेमवरचा तुझा राग दाखविण्यासाठी इस्राएलात शेष राहिलेल्या प्रत्येकाला तू ठार मारणार आहेस का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी अशी कत्तल चालवली असता मी सुटलो, तेव्हा मी उपडा पडून ओरडून म्हणालो, “हायहाय! प्रभू परमेश्वरा, तू यरुशलेमेवर आपल्या क्रोधाचा वर्षाव करून अवघ्या अवशिष्ट इस्राएलांचा विध्वंस करशील काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते लोकांना मारीत असताना मी एकटाच होतो, मी उपडा पडून मोठ्याने रडलो, “हाय हाय, सार्वभौम याहवेह! यरुशलेमवर आपण आपला कोप ओतून उरलेल्या सर्वच इस्राएली लोकांचा नाश करणार आहात काय?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते हल्ला करीत असतांना, मला स्वतःला एकटे वाटले. आणि मी उपडा पडून रडलो, हे प्रभू परमेश्वर देवा तुझ्या क्रोधाच्या ओतणीने तू सर्व उरलेल्या यरूशलेमातील इस्राएलाचा विध्वंस करशील काय?