Ezra 1:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि इस्राएलांपैकी जे कोणी शत्रूच्या तावडीतून बचावले असतील त्यांना ते असतील त्या ठिकाणच्या लोकांनी साहाय्य करावे. त्यांना चांदी, सोने, गायी-गुरे इत्यादी गोष्टी द्याव्यात. यरुशलेममधील मंदिरासाठी स्वखुशीने दाने द्यावीत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो कोणी शेष राहिला असून एखाद्या ठिकाणी उपरा म्हणून राहत असेल, त्याला तेथल्या माणसांनी चांदी, सोने, सामानसुमान व पशू देऊन साहाय्य करावे; ह्याखेरीज यरुशलेमेतील देवाच्या मंदिराकरता त्यांनी स्वसंतोषाची अर्पणे द्यावीत.” पाडाव करून नेलेले यरुशलेमेस परत येतात
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि उरलेले जे यहूदी लोक जिथे कुठे असतील त्यांनी यरुशलेमला जाणार्या यहूदी लोकांना सोने, चांदी, अन्य वस्तू आणि पशू, तसेच यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरासाठी स्वैच्छिक अर्पणेही पुरवावी.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसेच राज्यातील इतर भागात जे कोणी वाचलेले लोक आहेत, त्यांनी त्या भागातून यरूशलेमेत देवाच्या मंदिरासाठी स्वखुशीचे अर्पण देऊन सोने, चांदी व धन, गुरेढोरे इत्यादी गोष्टीचा त्यांना पुरवठा करावा.”