Ezra 1:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिवाय नबुखद्नेस्सरने यरुशलेमच्या मंदिरातील वस्तू काढून ज्या ठिकाणी त्याने आपले खोटे देव ठेवले होते. अशा स्वत:च्या मंदिरात ठेवल्या होत्या, त्या राजा कोरेशने बाहेर काढल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिराची जी पात्रे यरुशलेमेहून आणून आपल्या दैवतांच्या देवळात ठेवली होती ती सर्व पारसाचा राजा कोरेश ह्याने बाहेर काढली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या शिवाय बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने यरुशलेम येथील याहवेहच्या मंदिरातून नेलेल्या ज्या वस्तू आपल्या दैवतांच्या मंदिरात ठेवल्या होत्या, त्या कोरेश राजाने बाहेर काढल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेम मधून परमेश्वराच्या मंदिरातील जी पात्रे नबुखद्नेस्सराने काढून आपल्या स्वतःच्या देव-घरात ठेवली होती, ती कोरेश राजाने बाहेर काढली.