Ezra 10:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण आम्ही पुष्कळजण आहोत शिवाय हा पावसाळा आहे त्यामुळे आम्ही बाहेर थांबू शकत नाही. आमचा अपराध फार तीव्र असल्यामुळे हा एकदोन दिवसात सुटण्यासारखा प्रश्न नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण लोक पुष्कळ आहेत आणि पावसाची झड लागली असून आम्हांला बाहेर उभे राहता येत नाही, आणि हे काही एकदोन दिवसांचे काम नव्हे, कारण आम्ही ह्या बाबतीत मोठा अपराध केला आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण इथे अनेकजण आहेत आणि आता इतका जोरदार पाऊस पडतो आहे की आम्ही येथे बाहेर आपल्या शक्तीने थांबूही शकत नाही. तसेच आम्ही इतके घोर पातक केले आहे की हे सर्व सुरळीत होण्यास एक दोन दिवस पुरेसे होणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आम्ही पुष्कळजण आहोत शिवाय हा पावसाळा आहे त्यामुळे आम्हास बाहेर थांबण्याची शक्ती नाही. हे काम एकदोन दिवसाचे नाही. कारण या प्रकरणात आम्ही मोठ्या प्रमाणात मर्यादेचे उल्लंघन केले आहे.