Ezra 10:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
या समुदायाच्या वतीने आमच्यातूनच काहींना मुखत्यार नेमावे प्रत्येक नगरातल्या ज्या रहिवाश्यांनी परकीय बायकांशी लग्ने केली आहेत त्यांनी यरुशलेमला नेमलेल्या वेळी यावे त्या त्या नगरातील न्यायाधीश आणि वडीलधारी मंडळी यांनीही त्यांच्याबरोबर यावे. असे झाले की मग देवाचा आमच्यावरचा क्रोध मावळेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व मंडळीच्या तर्फे आमचे सरदार नेमावेत आणि आमच्या देवाचा भडकलेला तीव्र कोप आमच्यावरून दूर होईपर्यंत आणि ह्या प्रकरणाचे निराकरण होईपर्यंत आमच्या नगरांतल्या ज्या रहिवाशांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या आहेत त्यांनी नेमलेल्या वेळी यावे, आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक नगराचे वडील जन व न्यायाधीश ह्यांनीही यावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमच्या पुढार्यांना न्यायदानाची व्यवस्था करू द्या. ज्याला गैरयहूदी पत्नी आहे असा प्रत्येकजण ठरलेल्या वेळी आपल्या नगराचे वडीलजन व न्यायाधीश यांच्यासह येईल. मग परिस्थिती निवळेल आणि आपल्या परमेश्वराचा भयंकर कोप आम्हांपासून दूर होईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या समुदायाच्यावतीने आमच्यातूनच काहींना अधिकारी नेमावे. प्रत्येक नगरात ज्यांनी परक्या बायकांशी लग्ने केली आहेत त्यांनी यरूशलेमेला नेमलेल्या वेळी यावे त्या नगरातील न्यायाधीश आणि वडील मंडळी यांनीही त्यांच्याबरोबर यावे. असे झाले की मग देवाचा आमच्यावरचा क्रोध जाईल.”