Ezra 10:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यानुसार यहुदा आणि बन्यामीन यांच्या घराण्यातील सर्व पुरुषमंडळी तीन दिवसांच्या आत यरुशलेममध्ये जमली. हे लोक मंदिराच्या चौकात एकत्र आले. तो नवव्या महिन्याचा विसावा दिवस होता. एकत्र येण्यामागचे कारण आणि प्रचंड पाऊस यांच्यामुळे सर्वजण अतिशय कंपित झाले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यहूदा व बन्यामीन ह्यांतील सर्व लोक तीन दिवसांच्या आत यरुशलेमेत एकत्र झाले; हे सर्व नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी घडले. सर्व लोक देवाच्या मंदिराच्या चौकात सदरील कारणास्तव आणि पावसाच्या झडीमुळे थरथर कापत बसून राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तीन दिवसांच्या आत, नवव्या महिन्याच्या विसाव्या दिवशी, यहूदाहचे व बिन्यामीनचे सर्व लोक यरुशलेमात येऊन पोहोचले व परमेश्वराच्या मंदिरासमोर चौकात बसले. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे व जोरदार पावसामुळे ते अत्यंत क्लेशजनक स्थितीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानुसार यहूदा आणि बन्यामीन यांच्या घराण्यातील सर्व पुरुषमंडळी तीन दिवसाच्या आत यरूशलेमात जमली. तो नवव्या महिन्याचा विसावा दिवस होता. हे सर्व लोक देवाच्या घराच्या चौकातील प्रचंड पाऊसामुळे आणि देवाच्या वचनामुळे थरथर कापत उभे होते.