Ezra 2:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने जे लोक पाडाव करून बाबेलास नेले होते त्यांतले त्या मुलखात राहणारे बंधमुक्त होऊन यरुशलेमास व यहूदातील आपापल्या नगरी परत गेले ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने जे लोक धरून बाबेलला नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले, त्यांच्या नावांची ही यादी आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराने बाबेलास नेलेले यरूशलेम आणि यहूदा प्रांतातील बंद कैदी मुक्त होऊन आपापल्या नगरात परतले.