Ezra 2:59 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेल-मेलह, तेलहर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमला आले होते पण आपण इस्राएलच्या घराण्यातलेच वारसदार आहोत हे त्यांना सिध्द करता आले नाही ते असे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेल्मेलह, तेल्हर्षा, करूब, अद्दान व इम्मेर येथून जे वर आले ते हेच होते, परंतु ते इस्राएलातले होते किंवा नाही ह्याविषयी आपापली पितृकुळे व आपापली वंशावळी त्यांना दाखवता आली नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पर्शियाचे तेल-मेलाह, तेल-हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या शहरातून पुढील लोक आले. पण त्यांच्या वंशावळी हरवल्यामुळे ते इस्राएली वंशज असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरूशलेमेला आले होते पण आपण इस्राएलाच्या वंशातलेच पूर्वज आहोत हे ते सिद्ध करू शकले नाहीत.