Ezra 3:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे आवाज खूप दूरपर्यंत ऐकू जात होते. एकंदर आवाज एवढा मोठा होता की त्यातला रुदनस्वर कोणता व हर्षध्वनी कोणता हे ओळखू येत नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जयघोषाचा नाद व लोकांच्या रडण्याचा नाद ह्यांतील भेद लोकांना कळेना, कारण लोक उच्च स्वराने जयजयकार करत होते व त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोक इतक्या मोठ्याने जयघोष करीत होते की त्यांचा आवाज दूर अंतरावरूनही ऐकू येत होता आणि त्यामुळे रडण्याचा आवाज व आनंदाचा आवाज यातील फरक लोकांना समजत नव्हता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा आवाज बऱ्याच दूरपर्यंत ऐकू जात होता. एकंदर आवाज एवढा मोठा होता की, त्यातला रडण्याचा आवाज कोणता व आनंदाचा आवाज कोणता हे ओळखू येत नव्हते.