Ezra 3:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनंतर नित्याचे होमार्पण, नवचंद्रदिनी करायचे होमार्पण आणि परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे सणांचे आणइ दिवसांचे बळी द्यायला त्यांनी सुरुवात केली. याखेरीज लोकांनी परमेश्वराला स्वेच्छेनेही अनेक गोष्टी अर्पण केल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर रोजचे होमबली, चंद्रदर्शनाचे व परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे बली आणि कोणी परमेश्वराला दिलेला स्वसंतोषाचा बली हे सर्व अर्पण केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याशिवाय नेहमीचे होमबली आणि चंद्रदर्शनाचे व सर्व सणांचे बली, तसेच याहवेहच्या इतर वार्षिक उत्सवांचे बली व लोकांनी याहवेहसाठी स्वखुशीने आणलेले बली त्यांनी अर्पण केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर दररोजचे होमार्पण, चंद्रदर्शन याप्रकारे परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे होमार्पण त्याबरोबर स्वखुशीने करायचे सर्व अर्पण केले.