Ezra 3:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पाथरवटांना आणि सुतारांना द्रव्य पुरवले. अन्नधान्य, द्राक्षारस आणि तेलही दिले. सोरी आणि सीदोनच्या लोकांकडून लबानोनहून गंधसरुची लाकडे मागवण्याचा मोबदला म्हणून त्यांनी या वस्तू दिल्या. शलमोनाने पहिल्यांदा हे मंदिर बांधताना आणले तसे या लोकांना हे ओंडके जलमार्गाने योफा या समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरात आणवायचे होते. या वाहतुकीला पारसचा राजा कोरेश याने परवानगी दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी पाथरवटांना व सुतारांना पैसा दिला आणि पारसाचा राजा कोरेश ह्याच्या परवान्याने गंधसरूची लाकडे लबानोनाहून याफोला जलमार्गाने पोचती करावी म्हणून त्यांनी सीदोनी व सोरी लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तू व तेल दिले. मंदिराच्या पुनर्रचनेची सुरुवात
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर त्यांनी गवंडी व सुतार मोलमजुरीने लावले व सोर आणि सीदोन येथील लोकांकडून गंधसरूचे ओंडके विकत घेतले आणि त्याबद्दल त्यांनी त्यांना धान्य, द्राक्षारस व जैतुनाचे तेल दिले. हे ओंडके लबानोन पर्वतावरून आणण्यात आले व भूमध्य समुद्राच्या किनार्याने जलमार्गाने त्यांना याफो येथे पोचते करण्यात आले. हे सर्व पर्शियाचा राजा कोरेशच्या परवानगीने करण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी दगडकाम करणाऱ्यांना आणि सुतारांना चांदी दिली आणि त्यांना पारसाचा राजा कोरेश याच्या परवानगीने गंधसरूची लाकडे लबानोनातून याफोच्या समुद्रास आणावी म्हणून सोरी आणि सीदोनाच्या लोकांस अन्न, पेय व तेलही दिले.