Ezra 4:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या भागातील बरेच लोक यहूदा आणि बन्यामीन यांचे विरोधक होते. बंदिवासातून आलेले लोक परमेश्वरासाठी मंदिर बांधत आहेत हे या विरोधकांना कळले तेव्हा ते जरुब्बाबेल आणि घराण्यांचे प्रमुख यांच्याकडे येऊन म्हणाले, “आम्हालाही तुमच्या बांधकामात मदत करु द्या. तुमच्याप्रमाणेच आम्हीही या देवाला मदतीसाठी विनवितो. अश्शूरचा राजा एसर हद्दोन याने आम्हाला इकडे आणल्यापासून तुमच्या या देवासाठी आम्ही होमार्पण करीत आलो आहोत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधत आहेत असे यहूदा व बन्यामीन ह्यांच्या शत्रूंनी ऐकले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बंदिवासातून परत आलेले लोक याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराचे मंदिर पुन्हा बांधत आहेत, हे जेव्हा यहूदाह व बिन्यामीनच्या शत्रूंनी ऐकले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदा आणि बन्यामीन यांचे काही शत्रू होते. त्यांनी ऐकले की, बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधत आहेत.