Ezra 4:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यावर राजा अर्तहशश्तने पुढील उत्तर पाठविले: मुख्य राजमंत्री रहूम, लेखक शिमशय आणि शोमरोन व फरात नदीच्या पश्रिृमेला राहणारे त्यांच्याबरोबरचे लोक यांस:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग राजाने उत्तर पाठवले की, “रहूम राजमंत्री, शिमशय लेखक आणि शोमरोनात आणि महानदाच्या पश्चिमेकडे राहणारे त्यांचे इतर स्नेही ह्यांना सलाम, इत्यादी -
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर राजाने उत्तर दिले: राज्यपाल रहूम व शिमशय लेखक व शोमरोनात राहणार्या व फरात नदीच्या पश्चिमेस राहणार्या सर्वांना, शुभेच्छा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावर राजाने पुढील उत्तर पाठवले रहूम, शिमशय आणि त्याचे शोमरोनातले साथीदार व नदीच्या पलीकडे राहणारे बाकीचे लोक, “यांना शांती असो.