Ezra 4:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्या आधीच्या राजांच्या कारभाराचे वृत्तांत काढून पाहायचा मी आदेश दिला. त्यावरुन असे लक्षात आले की यरुशलेमला राजाच्या विरुध्द बंड करणाऱ्यांचा मोठा इतिहास आहे. फितुरीचे आणि बंडाचे प्रकार तेथे सतत घडत आले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या आज्ञेवरून शोध केला त्यात असे आढळून आले की प्राचीन काळापासून हे नगर राजांविरुद्ध बंड करीत आले आहे; बंड व राजद्रोह ह्यांचे हे माहेरघरच आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जुन्या नोंदी तपासून पाहण्याचा मी हुकूम दिला आहे आणि गतकाळात यरुशलेम नगर खरोखरच अनेक राजांची मोठी डोकेदुखी होती असे मला आढळून आले आहे. वास्तविक पाहता बंडाळी व राजद्रोह या गोष्टी येथे नेहमीच्याच होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकरीता मी चौकशी करण्याचा आदेश दिला आणि तेव्हा असा शोध लागला की, मागील दिवसात राजाच्या विरूद्ध बंड करीत आणि त्यामध्ये बंड व फितुरी केल्याचे प्रकार तेथे सतत घडत आले आहेत.