Ezra 4:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहूद्यांचा मंदिर बांधावयाचा संकल्प सिध्दीला जाऊ नये म्हणून विरोधकांनी पैसे चारुन मंत्र्यांना फितवले. त्या मंत्र्यांनी यहूद्यांचा मंदिर बांधण्याचा बेत बंद पाडण्यासाठी सतत कारस्थाने केली. पारसाच्या कोरेश राजाची कारकीर्द संपून दरायावेश राजा सत्तेवर येईपर्यंत असेच चालले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचा संकल्प व्यर्थ जावा म्हणून त्यांच्याशी विरोध करण्यासाठी त्यांनी पैसे देऊन वकील ठेवले; पारसाचा राजा कोरेश ह्याच्या सर्व कारकिर्दीत व पारसाचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीपर्यंत हे असे चालले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी अधिकार्यांना त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी लाच दिली आणि त्यांचे मनसुबे उधळले. पर्शियाचा राजा कोरेशच्या सर्व कारकिर्दीत व दारयावेश राजाच्या राजवटीपर्यंत हे चालले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पारसाच्या कोरेश राजाची सर्व कारकीर्द संपून दारयावेश राजा सत्तेवर येईपर्यंत त्यांची योजना उधळून लावण्यासाठी ते वकीलाला लाचही देत.