Ezra 5:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने देवाचा कोप ओढवला. तेव्हा परमेश्वराने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले. नबुखद्नेस्सराने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांना जबरदस्तीने कैद करुन बाबेलला नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमच्या वाडवडिलांनी स्वर्गीच्या देवाला चिडवून संतप्त केले तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर खास्दी ह्याच्या हाती दिले; त्याने ह्या मंदिराचा विध्वंस करून येथील लोकांना बाबेलास नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण आमच्या पूर्वजांनी स्वर्गाच्या परमेश्वराला संतप्त केले, म्हणून त्यांनी आमच्या लोकांना बाबेलचा खाल्डियन राजा नबुखद्नेस्सरच्या अधीन केले, ज्याने मंदिराचाही नाश केला व लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने स्वर्गातील देवाला चिडवून संतप्त केले. तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर खास्दी याच्या हाती दिले आणि त्याने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांस कैद करून बाबेलला नेले.