Ezra 5:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तसेच, पूर्वीच्या मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे होती ती काढून बाबेलच्या खोट्या देवतेच्या देवळात ठेवली होती, ती कोरेशाने बाहेर काढली. नबुखद्नेस्सराने ती पूर्वी यरुशलेममधून काढून बाबेलच्या खोट्या देवतेच्या देवळात आणली होती. राजा कोरेशने ती शेशबस्सरच्या (म्हणजेच जरुब्बाबेलाच्या) स्वाधीन केली. त्याला कोरेशने अधिकारी म्हणून नेमले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाच्या मंदिरातली सोन्यारुप्याची पात्रे नबुखद्नेस्सराने यरुशलेमाच्या मंदिरातून काढून नेऊन बाबेलातील मंदिरात ठेवली होती ती कोरेश राजाने तेथील मंदिरातून बाहेर काढून शेशबस्सर नावाच्या पुरुषास अधिकारी नेमून त्याच्या हवाली केली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिराची जी सोन्याचांदीची पात्रे यरुशलेमाच्या मंदिरातून काढून नेली व बाबेलच्या मंदिरात ठेवली होती, ती कोरेश राजाने परत केली. ती पात्रे त्याने नेमलेला यहूदाहचा राज्यपाल शेशबस्सरच्या ताब्यात दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसेच, देवाच्या मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे होती ती नबुखद्नेस्सराने यरूशलेमतल्या मंदिरातून काढून बाबेलच्या देवळात ठेवली होती. राजा कोरेशने ती शेशबस्सरच्या स्वाधीन केली. त्यास कोरेश राजाने अधिकारी म्हणून नेमले होते.