Ezra 5:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा आता हवे असल्यास राजाने अधिकृत कागदपत्रे नीट तपासून पाहावीत. यरुशलेममधील मंदिर पुन्हा बांधायची राजा कोरेशने खरोखरच आज्ञा दिली आहे का ते पडताळून पाहावे आणि या बाबतीत आपण काय ठरविले आहे ते राजाने आम्हाला कृपया लेखी कळवावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा कोरेश राजाने यरुशलेमेत देवाचे मंदिर बांधण्याची आज्ञा दिली होती किंवा नाही ह्याचा शोध महाराजांच्या मर्जीस आल्यास बाबेलच्या राजभांडारात करावा; ह्या प्रकरणी महाराजांची काय मर्जी आहे ते आम्हांला कळवावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही विनंती करतो की बाबेलचे राजकीय दप्तर तपासले जावे व कोरेश राजाने परमेश्वराच्या मंदिराची यरुशलेममध्ये पुनर्बांधणी करावी अशी आज्ञा दिली होती की नाही हे पाहावे व मग आपली या प्रकरणी काय इच्छा आहे हे आम्हाला कळवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा आता जर राजाला चांगले वाटले तर यरूशलेमात मंदिर पुन्हा बांधण्याची राजा कोरेशाने खरोखरच आज्ञा दिली आहे का ते बाबेलाच्या राजभांडारात चौकशी करावी. मग राजाचा याबाबतीत काय निर्णय आहे ते आम्हास कळवावे.