Ezra 5:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यावेळी ततनइ हा फरात नदीच्या पश्रिमेकडील प्रदेशाचा अधिकारी होता. तो, शथर - बोजनइ आणि त्यांचे सोबती जरुब्बाबेल, येशूवा आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना ततनइ व त्याच्याबरोबरच्या लोकांनी विचारले, “तुम्हाला हे मंदिर पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वेळेस महानदाच्या पश्चिमेकडच्या प्रांताचा अधिपती ततनइ व शथर-बोजनइ व त्यांचे स्नेही हे सर्व त्यांच्याकडे येऊन म्हणाले, “हे मंदिर बांधण्याचा व हा कोट उभारण्याचा हुकूम तुम्हांला कोणी दिला आहे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु फरातच्या पश्चिमेकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ आणि शथर-बोजनइ व त्यांचे सोबती यरुशलेमात आले व त्यांनी विचारले, “हे मंदिर पुनर्बांधणीची व पूर्ण करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यावेळी ततनइ हा नदीच्या पलीकडील प्रांताचा अधिकारी होता. तो शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती जरुब्बाबेल, येशूवा आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांच्याकडे येऊन म्हणाले, “तुम्हास हे मंदिर व भिंत पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली?”