Ezra 6:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वल्हांडण सण साजरा करण्यासाठी याजक आणि लेवी यांनी शुचिर्भूत होऊन स्वत:ला शुध्द केले. कैदेतून सुटून आलेले आपले भाऊबंद याजक आणि ते स्वत: या सर्व यहुद्यांसाठी लेवींनी वल्हांडणाच्या कोकराचा बळी दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजक व लेवी ह्यांनी एकचित्ताने आपणांस शुद्ध केले होते; ते शुद्ध झाले होते; त्यांनी बंदिवासातून परत आलेल्या सर्व लोकांसाठी, आपले भाऊबंद जे याजक त्यांच्यासाठी व स्वतःसाठी वल्हांडणपशू मारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तोपर्यंत याजक आणि लेवी यांनी विधीनियमाप्रमाणे स्वतःला शुद्ध करून घेतले होते. लेव्यांनी वल्हांडण सणाच्या अर्पणासाठी बंदिवासातून परत आलेल्या लोकांसाठी आणि याजकांसाठी व स्वतःसाठी वल्हांडणाची मेंढरे वधली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वल्हांडण सण साजरा करण्यासाठी याजक आणि लेवी यानी एकचित्ताने स्वत:ला शुद्ध केले. कैदेतून आलेल्या सर्व लोकांसाठी व आपल्यासाठी त्यांनी वल्हांडणाचा कोकरा बली दिला.