Ezra 6:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बंदिवासातून परतून आलेल्या समस्त इस्राएल लोकांनी वल्हांडणाचे भोजन केले. त्या देशाच्या मूर्तीपूजक लोकांच्या अशुध्दतेपासून दूर व्हावे म्हणून इतरांनीही शुचिर्भूत होऊन त्या भोजनाचा आस्वाद घेतला. इस्राएलचा परमेश्वरा याला मदतीसाठी शरण जाता यावे म्हणून त्यांनी हे शुध्दीकरण केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंदिवासातून परत आलेल्या इस्राएल लोकांनी आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या भजनी लागण्यासाठी जे सर्व लोक त्या देशाच्या मूर्तिपूजक लोकांच्या अशुद्धतेपासून दूर राहिले होते त्या सर्वांनी भोजन केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बंदिवासातून परत आलेल्या यहूदी आणि यहूदीयात वस्ती करून राहिलेले इस्राएली लोक मूर्तिपूजक परकीय लोकांच्या अशुद्ध चालीरीतींना सोडून, याहवेह परमेश्वराच्या भक्तीमध्ये सामील झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बंदिवासातून परतून आलेल्या समस्त इस्राएल लोकांनी वल्हांडणाचे भोजन केले. इस्राएलाचा देव परमेश्वर याला शोधायला जे देशातील लोकांच्या अशुद्धतेपासून दूर होऊन त्यांच्याकडे आले होते त्यांनी ते खाल्ले.