Ezra 6:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मंदिरातील सोन्यारुप्याच्या वस्तू पुन्हा आपापल्या जागी ठेवल्या जाव्यात. नबुखद्नेस्सरने त्या यरुशलेमच्या मंदिरातून हलवून बाबेलला आणल्या होत्या. त्यांची पुन्हा मंदिरात स्थापना व्हावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाच्या मंदिरातील सोन्याचांदीची जी पात्रे नबुखद्नेस्सराने यरुशलेमेतील मंदिरातून बाबेलास आणली आहेत ती परत नेऊन यरुशलेमेतील मंदिरात जेथल्या तेथे ठेवावीत; ती तू देवाच्या मंदिरात ठेवून दे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि जी सोन्याचांदीची पात्रे नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिरातून बाबेलला नेली होती, ती सर्व यरुशलेमला परत नेण्यात येतील व पूर्वीसारखी परमेश्वराच्या मंदिरात ठेवली जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाच्या घरातील सोन्यारुप्याची पात्रे जी नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून काढून बाबेलला आणली आहेत ती परत करावी. ती तू यरूशलेमास पाठवावी आणि देवाच्या घरात जमा करावी.’