Ezra 6:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता माझा आदेश असा आहे: देवाच्या मंदिराचे बांधकाम करणाऱ्या यहूदी वडीलजनांसाठी असे करा. मंदिराच्या बांधकामाचा पूर्ण खर्च राजाच्या खजिन्यातून दिला जावा. हा पैसा फरात नदीच्या पश्रिमेकडील प्रांतांमधून येणाऱ्या करातून जमा होईल. या गोष्टी विनाविलंब करा म्हणजे कामाला खीळ बसणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याखेरीज हे देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहूद्यांच्या वडील जनांशी तुमचे काय कर्तव्य आहे ह्याविषयी मी तुम्हांला अशी आज्ञा करतो की राजधनातून म्हणजे अर्थात महानदाच्या पश्चिम प्रांतांच्या करामधून ह्या लोकांना खर्च ताबडतोब पुरवावा; त्यांना काही अडथळा करू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एवढेच नव्हे, तर परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाकरिता यहूद्यांच्या मदतीसाठी हे करण्याची मी तुम्हाला आज्ञा देतो: मंदिर बांधण्यास येणारा सर्व खर्च फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाच्या राजकीय खजिन्यातून त्यांच्या मागणीनुसार देण्यात यावा, जेणेकरून कामास विलंब होणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता माझा आदेश असा आहे. देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहूदी वडीलजनांसाठी पूर्ण खर्च राजाच्या निधीतून नदीच्या पलीकडील येणाऱ्या खंडणीतून त्या मनुष्यांना देण्यासाठी वापरावा. यासाठी की, त्यांनी त्यांचे काम थांबवू नये.