Ezra 6:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या लोकांना लागेल ते द्या. स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्यांना गोऱ्हे, मेंढे, कोकरे हत्यादी ज्या गोष्टी लागतील त्या द्या. यरुशलेममधील याजकांनी गहू, मीठ, द्राक्षारस तेल वगैरे मागीतल्यास त्यांना त्या वस्तू तात्काळ आणि रोजच्या रोज पुरवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्वर्गीच्या देवास होमार्पणांसाठी गोर्हे, मेंढे, कोकरे आदिकरून ज्या वस्तू लागतील त्या आणि गहू, मीठ, द्राक्षारस व तेल, हे यरुशलेमेतील याजक जितके मागतील तितके प्रतिदिनी त्यांना द्यावे; ह्यात काही खंड पडू नये;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
स्वर्गातील परमेश्वराला होमार्पणे करण्यासाठी गोर्हे, मेंढरे व कोकरे द्यावीत, आणखी त्यांना गहू, द्राक्षारस, मीठ आणि जैतुनाचे तेल हे पदार्थ यरुशलेमातील याजकांच्या मागणीनुसार प्रत्येक दिवशी न चुकता द्यावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्या लोकांस जे काही लागेल ते बैल, मेंढे, कोकरे आणि यरूशलेमेमधील याजकांना मागतील तितके गहू, मीठ, द्राक्षरस तेल या वस्तू त्यांना रोजच्या रोज न चुकता द्या.