Ezra 7:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्व बाबेलभर फिरुन तू लोकांकडून तसेच याजक व लेवी यांच्याकडून देणग्या गोळा कराव्यास. स्वखूशीने दिलेल्या त्या वस्तू यरुशलेममधील त्यांच्या देवाच्या मंदिरासाठी आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच जेवढे सोने व रुपे सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल आणि लोक व याजक यरुशलेमेतील आपल्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ जे स्वसंतोषाचे अर्पण देतील ते सर्व तू न्यावेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व बाबेल प्रांतामध्ये तू गोळा केलेले सोने व चांदी, तसेच यरुशलेममधील आपल्या यरुशलेमच्या परमेश्वराच्या मंदिरासाठी इस्राएली लोक व त्यांच्या याजकांनी स्वखुशीने दिलेली अर्पणेही बरोबर घेऊन जावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे लोक तसेच याजक आपल्या देवाचे घर जे यरूशलेमेत आहे त्यासाठी स्वखुशीने अर्पण करीत असतील त्यांच्या स्वखुशीच्या अर्पणाबरोबर जे सोनेचांदी सर्व बाबेल प्रांतात तुला मिळेल ते सर्वही न्यावे.