Ezra 7:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता, मी, राजा अर्तहशश्त, असा आदेश काढतो की फरात नदीच्या पश्रिृमेकडील भागातले जे खजिनदार आहेत त्यांनी एज्राला हवे ते पुरवावे. कारण एज्रा हा स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक आणि याजक आहे. याची अंमलबजावणी पूर्णत्वाने आणि ताबडतोब करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी अर्तहशश्त राजा महानदाच्या पश्‍चिमेकडील सर्व भांडार्‍यांस अशी आज्ञा करीत आहे की, एज्रा याजक जो स्वर्गीच्या देवाच्या नियमशास्त्रात पारंगत आहे तो जे काही तुमच्याकडे मागेल ते सर्व ताबडतोब त्याला द्यावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता, मी राजा अर्तहशश्त, हा हुकूमनामा फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांतातील सर्व खजिनदारांकडे पाठवित आहे. स्वर्गातील परमेश्वराचे नियम शिकविणारा शिक्षक व याजक एज्रा जी विनंती करेल व जे तुमच्याकडे मागेल ते त्याला द्यावे—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता, मी, राजा अर्तहशश्त, असा आदेश काढतो की नदीपलीकडच्या सर्व खजिनदारांनी जे काही एज्रा तुम्हाजवळ मागेल ते पूर्ण द्यावे,