Ezra 7:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझे देवाविषयीचे ज्ञान वापरुन तू धार्मिक आणि नागरी क्षेत्रात न्यायाधीश नेमावेस. तसा अधिकार मी तुला देतो. फरात नदीच्या पश्रिमेकडील भागातल्या लोकांचे ते न्यायाधीश होतील. देवाचे नियमशास्त्र जाणणाऱ्या सर्वांवर ते नागरी आणि धार्मिक न्यायाधीश नियुक्त करतील. आणि ज्यांना देवाच्या आज्ञा माहीत नाहीत अशांना ते त्या शिकवतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे एज्रा, तुला तुझ्या देवाने ज्ञान दिले त्याच्या योगे शास्ते व न्यायाधीश ह्यांची नेमणूक कर; तुझ्या देवाचे नियमशास्त्र जाणणार्‍या अशा त्या महानदाच्या पश्‍चिमेकडील सर्व रहिवाशांचा त्यांनी न्यायनिवाडा करावा आणि त्यासंबंधाने जे अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही शिकवावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि एज्रा, तुला परमेश्वराने दिलेली सुज्ञता वापरून परमेश्वराच्या नियमाचे पालन करणाऱ्या न्यायाधीश व इतर अधिकारी यांची निवड आणि नेमणूक करावी. हे अधिकारी फरात नदीच्या पश्चिमेकडील भागात न्यायदान करतील. जर त्यांना तुमच्या परमेश्वराचे नियम माहीत नसतील, तर तू ते त्यांना शिकवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एज्रा देवाने जे ज्ञान तुला दिले त्याच्यायोगे तू शास्ते व धार्मिक आणि न्यायाधीश यांची नेमणूक कर. तुझ्या देवाचे नियम जाणणाऱ्या नदीच्या पलीकडील लोकांचे ते न्यायाधीश होतील. आणि ज्यांना देवाचे नियम माहीत नाहीत अशांना ते शिकवतील.