Ezra 7:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो कोणी तुमच्या देवाच्या आज्ञा किंवा राजाचे आदेश पाळणार नाही त्याला शासन झाले पाहिजे. त्याला मृत्युदंड द्यायचा की हद्दपार करायचे की द्रव्यदंड करायचे की कैदेत टाकायचे ते त्याने केलेल्या गुन्ह्याच्या स्वरुपावर अवलंबून राहील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे कोणी तुझ्या देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे आणि राजाच्या कायद्याप्रमाणे वागणार नाहीत त्यांना ताबडतोब शासन करावे; प्राणदंड, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती अथवा कैद ह्यांतील कोणतीही शिक्षा त्यांना करावी.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या परमेश्वराची आज्ञा न मानणार्यांना आणि राजांचे नियम मोडणार्यांना ताबडतोब मृत्यू, हद्दपारी, मालमत्तेची जप्ती, किंवा तुरुंगवास यापैकी कोणतीही शिक्षा द्यावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी तुमच्या देवाच्या आज्ञा किंवा राजाचे आदेश पाळणार नाही त्यास शासन झाले पाहिजे. त्यास मृत्युदंड, हद्दपार, मालमत्तेची जप्ती, कैद करायचे ते त्याने केलेल्या गुन्ह्याच्या स्वरुपावर अवलंबून राहील.”