Ezra 7:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा, त्याचे मंत्री आणि अधिकारी यांच्या डोळ्या देखतच परमेश्वराने माझ्यावर कृपा केली. परमेश्वराचा पाठिबा लाभल्यामुळे मला धैर्य आले. इस्राएलातील पुढारी मंडळींना बरोबर घेऊन मी यरुशलेमला निघालो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा, त्याचे मंत्री व राजाचे सर्व पराक्रमी सरदार ह्यांची माझ्यावर दया व्हावी असे देवाने केले आहे. माझा देव परमेश्वर ह्याचा माझ्यावर वरदहस्त होता. त्यामुळे हिंमत धरून माझ्याबरोबर जाण्यासाठी इस्राएलातील प्रमुख पुरुष मी एकत्र केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यांनी राजासमोर व त्याच्या सात जणांच्या सल्लागार मंडळासमोर व सरदारांसमोर माझ्यावर मेहेरबानी केली. याहवेह माझ्या परमेश्वराच्या कृपेचा वरदहस्त माझ्यावर असल्यामुळेच मी धाडस करून काही इस्राएली पुढार्यांना मजबरोबर यरुशलेमला येण्यासाठी जमा केले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि राजा, त्याचे सल्लागार आणि सर्व पराक्रमी अधिकारी यांची माझ्यावर कृपादृष्टी होईल असे केले आहे आणि परमेश्वर माझा देव याचा हात माझ्यावर होता. मी इस्राएलातील पुढारी माझ्याबरोबर जाण्यासाठी जमवले.