Ezra 8:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी (म्हणजे एज्राने) या सर्व लोकांना अहवाकडे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाजवळ बोलावून घेतले. त्या ठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मला असे समजले की या लोकांमध्ये याजक होते पण लेवी नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहवा नदीला जी नदी मिळते तिच्याजवळ मी त्यांना जमवले; तेथे आम्ही डेरे देऊन तीन दिवस राहिलो; आणि मी लोकांची व याजकांची पाहणी केली तेव्हा मला लेवीच्या वंशातले कोणी दिसले नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहवाकडे जाणाऱ्या कालव्याजवळ मी सर्वांना एकत्र केले आणि तिथे तीन दिवस आम्ही तळ दिला. तिथे आलेल्या लोकांची व याजकांची पाहणी केली, तेव्हा लेवी वंशातील कोणीही मला आढळला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यांना अहवाकडे वाहणाऱ्या कालव्याजवळ जमवले. त्याठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मी लोकांची व याजकांची तपासणी केली पण तेथे लेवीचे कोणीही वंशज सापडले नाहीत.