Ezra 8:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांना इद्दोकडे पाठवले. इद्दो हा कासिक्या नगराचा मुख्य. त्याला आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी या मंडळींना सांगितले होते. इद्दोचे नातलगांना कासिक्याच्या मंदिरातील सेवेकरी होते. परमेश्वराच्या मंदिरातील सेवाचाकरी प्रीत्यर्थ माणसे मिळावीत म्हणून मी माझ्या लोकांना इद्दोकडे पाठवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांना कासिफ्या नावाच्या स्थानाचा नायक इद्दो ह्याच्याकडे पाठवले आणि आमच्याकडे आमच्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सेवाचाकरी करणारे घेऊन यावेत म्हणून कासिफ्या येथे इद्दो व त्याचे बांधव नथीनीम ह्यांना काय सांगावे हे मी त्यांना कळवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी त्यांना कासिफ्या नावाच्या ठिकाणी असलेल्या यहूद्यांचा पुढारी इद्दो आणि मंदिरात काम करणारे त्याचे लेवीबंधू याजकडे अशी विनंती करण्यासाठी पाठविले की त्यांनी यरुशलेमातील आमच्या परमेश्वराच्या मंदिरातील सेवेसाठी सेवेकरी पाठवावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कासिफ्याचा मुख्य इद्दो याच्याकडे मी त्यांना पाठवले. त्यास आणि त्याच्या नातलगांना काय सांगायचे हे मी त्यांना सांगितले. जे मंदिरात सेवाचाकरी करणारे कासिफ्यात राहत होते त्यांनी देवाच्या घरात सेवाचाकरी करण्यासाठी आमच्याकडे माणसे पाठवावीत.