Ezra 8:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवाचाकरीसाठी दोनशेवीस जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दावीदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवींचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिलेली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याशिवाय दावीद व सरदार ह्यांनी लेव्यांच्या सेवेसाठी नेमून दिलेल्या नथीनीमांपैकी दोनशे वीस आणले; ह्या सर्वांची नावे नोंदली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाने व अधिकार्‍यांनी जे लेव्यांच्या सेवेसाठी नेमले होते, असे 220 मंदिरसेवकही आणले, ज्यांची नांवे नोंदण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिवाय त्यांनी मंदिरातल्या सेवा चाकरीसाठी दोनशे वीस जणांना पाठवले. या लोकांच्या पूर्वजांना दावीदाने आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लेवीचे मदतनीस म्हणून निवडले होते. त्या सर्वांची नावे यादीत लिहिलेली होती.