Ezra 8:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर चीजवस्तू यांचे नीट वजन करुन या गोष्टी मी या बारा याजकांना दिल्या. या वस्तू राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि बाबेलमधील इस्राएल लोक यांनी दिल्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे सोनेरुपे व जी पात्रे राजा, त्याचे मंत्री, त्याचे सरदार व तेथे असलेले सर्व इस्राएल ह्यांनी आमच्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ अर्पण केली होती ती तोलून मी त्यांच्या स्वाधीन केली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा, त्याचे कारभारी मंडळ, पुढारी आणि इस्राएली लोक यांनी परमेश्वराच्या मंदिरासाठी अर्पण केलेले सोने, चांदी, सोन्याची पात्रे व इतर वस्तू मोजून दिले व ते यरुशलेमला नेण्याची जबाबदारी मी त्या बारा पुढार्यांवर टाकली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर वस्तू देवाच्या घरासाठी जे अर्पण राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि इस्राएल लोकांनी स्वखुशीने अर्पिले होते ते तोलून दिले.