Ezra 8:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग मी त्या बारा याजकांना म्हणालो, “तुम्ही तसेच या वस्तू देखील देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी दिलेली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांना म्हणालो, “तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहात, व ही पात्रेही पवित्र आहेत; हे सोनेरुपे तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ स्वसंतोषाचे अर्पण म्हणून आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मी त्यांना म्हणालो, “तुम्ही, तसेच याहवेह आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराला वाहिलेली स्वैच्छिक अर्पणे म्हणजे सोने चांदी व सोन्याचांदीची पात्रे याहवेह परमेश्वराला समर्पित केलेली आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी त्यांना म्हणालो, “तुम्ही तसेच या वस्तू देखील परमेश्वर देवाच्या दृष्टीने पवित्र आहेत. लोकांनी हे सोने व चांदी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासाठी स्वखुशीचे अर्पण आहे.