Ezra 8:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चौच्या दिवशी मंदिरात गेलो आणि सोने - चांदी व इतर वस्तू वजन करुन उरीया याजकाचा मुलगा मरेमोथ यांच्याकडे दिल्या. तेव्हा फिनहासचा मुलगा एलाजार तसेच येशूवाचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा नोअद्या हे लेवी, एवढे जण मरेमोथ बरोबर होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चौथ्या दिवशी ते सोनेरुपे व ती पात्रे आमच्या देवाच्या मंदिरात तोलून मरेमोथ बिन उरीया याजकाच्या हवाली केली; त्याच्याबरोबर एलाजार बिन फिनहास, योजाबाद बिन येशूवा आणि नोवद्या बिन बिन्नुई हे लेवी होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चवथ्या दिवशी उरीयाह पुत्र मरेमोथ याजकाच्या हाती, फिनहासाचा पुत्र एलअज़ार, येशूआचा पुत्र योजाबाद आणि बिन्नुईचा पुत्र नोअद्याह हे लेवी देखील त्याच्यासह असून रुपे, सोने व इतर मोलवान वस्तू यांचे परमेश्वराच्या मंदिरात वजन करून सोपविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चौथ्या दिवशी देवाच्या मंदिरात ते सोने, चांदी व इतर वस्तू वजन करून उरीया याजकाचा मुलगा मरेमोथ यांच्याकडे देण्यात आल्या. तेव्हा फिनहासचा मुलगा एलाजार तसेच येशूवाचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा नोअद्या हे लेवी, एवढे जण मरेमोथ बरोबर होते.