Ezra 9:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे सर्व आटोपल्यावर मग इस्राएलींमधली नेते मंडळी माझ्याकडे आली. ती मला म्हणाली, “एज्रा, इस्राएल लोकांनी आपल्या अवतीभवती राहणाऱ्या इतर लोकांपासून स्वत:ला वेगळे ठेवलेले नाही. याजक आणि लेवी सुध्दा वेगळे राहात नाहीत. कनानी, हित्ती, परिज्जी, यहूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी आणि अमोरी लोक ज्या अमंगळ गोष्टी करतात त्यांचा प्रभाव इस्राएलांवर पडतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या सर्व गोष्टी झाल्यावर सरदार माझ्याकडे येऊन म्हणू लागले, “इस्राएल लोक, याजक व लेवी हे देशोदेशींच्या लोकांपासून निराळे राहत नाहीत; ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी व अमोरी ह्यांच्याप्रमाणेच अमंगळ कृत्ये करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या सर्व गोष्टी आटोपल्यावर, यहूद्यांचे पुढारी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले, “इस्राएली लोक, याजक आणि लेवी यांनी स्वतःला कनानी, हिथी, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मोआबी, इजिप्तचे व अमोरी या मूर्तिपूजक लोकांच्या घृणास्पद चालीरीतीपासून अलिप्त ठेवले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या सर्व गोष्टी झाल्यावर अधिकारी माझ्याकडे येऊन म्हणाले, “इस्राएल लोक, याजक आणि लेवी हे इतर देशाच्या लोकांपासून वेगळे राहत नसून व ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी आणि अमोरी यांच्याप्रमाणेच घृणास्पद कृत्ये करतात.