Ezra 9:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, तुझे सेवक, संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हाला त्या आज्ञा दिल्यास; तू म्हणालास, “तुम्ही जो प्रदेश ताब्यात घेऊन त्यात वास्तव्य करणार आहात तो वाया गेलेला देश आहे. तिथे राहणाऱ्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी तो अशुध्द झाला आहे; हा सर्वच प्रदेश त्या लोकांनी विटाळून टाकला आहे. आपल्या पापांनी ही भूमी त्यांनी अमंगळ केली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपले सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे दिलेल्या आज्ञा आम्ही मोडल्या आहेत; तू सांगितले होते की, ‘जो देश ताब्यात घेण्यास तुम्ही जात आहात तो देश देशोदेशींच्या लोकांच्या अशुद्धतेमुळे व अमंगळ कृतींमुळे अशुद्ध झाला आहे; त्यांनी तो देश ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचे सेवक संदेष्टे, त्यांनी आम्हाला आधीच इशारा देऊन ठेवला होता: ‘जो देश आम्हाला वतन म्हणून मिळेल, तो देश तिथे राहणार्या लोकांच्या भयंकर अमंगळ चाली व कृत्ये यांनी भ्रष्ट झालेला असेल. खरोखरच आज देशाच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यत तो अपवित्रतेने भरलेला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या आज्ञा, तुझे सेवक जे संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हास दिल्यास. जेव्हा तू म्हणालास, तुम्ही ज्या देशात प्रवेश करून ताब्यात घेण्यास जात आहात तो अशुद्ध देश आहे. तो त्या देशाच्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे.