Ezra 9:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आमच्यावर जी संकटे आली त्याला आम्हीच कारणीभूत आहोत. आम्ही दुर्वर्तन केले आणि त्याची आम्हाला खंत आहे. पण, परमेश्वरा, आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हाला केलेले शासन कमीच आहे. आम्ही जे भयंकर गुन्हे केले त्यांची जबरदस्त शिक्षा आम्हाला व्हायला हवी होती. आणि तू तर आमच्यापैकी काही जणांना बंदिवासातूनही सोडवलेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमच्या दुष्कृत्यांमुळे व आमच्या मोठ्या अपराधांमुळे हे सर्व आमच्यावर ओढवले असून आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून, हे देवा, तू आम्हांला कमी शासन केले व आमच्यातल्या इतक्या लोकांना वाचवून अवशेष ठेवले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तर सत्य हे आहे की ही परिस्थिती केवळ आपल्याच वाईट कृत्यांमुळे आणि घृणास्पद अपराधांमुळे आपल्यावर आली आहे. असे असूनही, आमच्या परमेश्वराने आमच्या अपराधास योग्य शिक्षेपेक्षा कमी शिक्षा देऊन हा भाग आमच्या स्वाधीन केला आहेस
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमच्या वाईट कृत्यामुळे आणि महान दोषामुळे हे सर्व आम्हावर आल्यानंतर, हे आमच्या देवा आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हास केलेले शासन कमीच आहे आणि तू आम्हास वाचवून अवशेष ठेवले.