Ezra 9:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकांनी या इतर लोकांशी विवाहसंबंध ठेवले आहेत. इस्राएल लोकांनी आपले वेगळेपण टिकवले पाहिजे. पण त्यांचे यहुदी नसलेल्या लोकांचे नेते आणि आधिकारी यांनीच या बाबतीत वाईट उदारहण घालून दिले आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी आपणांस व आपल्या पुत्रांस त्यांच्या कन्या केल्या आहेत; पवित्र बीज देशोदेशीच्या लोकांत मिसळून गेले आहे; सरदार व शास्ते ह्यांचा हात ह्या पातकात प्रमुख आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या लोकांनी सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या कन्यांचा स्वतःशी व आपल्या पुत्रांशी केलेल्या या विवाहांमुळे परमेश्वराचे पवित्र लोक मिश्रित झाले आहेत. काही राजकीय पुढारी आणि अधिकाऱ्यांनी तर या विश्वासघातात पुढाकार घेतला आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण त्यांनी आपणाला व आपल्या मुलांना त्यांच्या काही स्त्रिया करून घेतल्या आहेत आणि पवित्र लोक इतर देशाच्या लोकांबरोबर मिसळून गेले आहेत. आणि अधिकारी व नेते हेच प्रथम यामध्ये अप्रामाणिक आहेत.”