Ezra 9:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा देवाच्या आज्ञा मानणाऱ्या सर्व लोकांचा भीतीने थरकाप झाला. बंदिवासातून आलेले इस्राएली लोक देवावर निष्ठा असणारे नव्हते म्हणून ते घाबरले; मला ही धक्का बसला; संध्याकाळच्या होमार्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे बसून राहिलो; सर्वजण माझ्याभोवती जमले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकांसंबंधाने देवाचे वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला, ते सगळे माझ्याजवळ जमा झाले, व मी संध्याकाळच्या अर्पणसमयापर्यंत चिंताक्रांत होऊन बसलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या विश्वासघातामुळे बंदिवासातून परतलेल्या इस्राएली लोकांच्या मनात परमेश्वराच्या वचनाचे भय उत्पन्न झालेले पुष्कळजण माझ्याभोवती गोळा झाले. सायंकाळच्या होमार्पणाची वेळ होईपर्यंत मी तिथेच बसून राहिलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा या अविश्वासूपणाविषयी ऐकून जे सर्व इस्राएली लोक देवाच्या वचनाने थरथर कापत होते ते माझ्याभोवती जमले आणि संध्याकाळची अर्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे शरमेने खाली बसून राहिलो.